डॉ.आ.ह.साळुंखे लिखित पाच मराठी पुस्तके.

डॉ.आ.ह.साळुंखे लिखित पाच मराठी पुस्तके.

Prix promotionnel  Rs1,750.00 Prix régulier Rs1,790.00
Passer aux informations sur le produit
डॉ.आ.ह.साळुंखे लिखित पाच मराठी पुस्तके.

डॉ.आ.ह.साळुंखे लिखित पाच मराठी पुस्तके.

Prix promotionnel  Rs1,750.00 Prix régulier Rs1,790.00
En stock
💵
Cash on Delivery
↩️
Easy 5 Days Return
📦
Secure Delivery

Get your books delivered in 3–6 days

1) हिंदू संस्कृती आणि स्त्री -

भारतीय समाजातील स्त्रीवरील अन्याय, दडपशाही आणि तिच्यावर लादलेले निकृष्ट जीवन हे आपल्या सामाजिक अध:पतनाचे मूळ कारण आहे. शतकानुशतकांपासून स्त्रीला हीन समजण्याची प्रवृत्ती धर्म, परंपरा आणि अंधश्रद्धांच्या माध्यमातून खोलवर रुजलेली आहे. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही — गर्भलिंगचाचणी, सतीसारख्या प्रथा, स्त्रीहत्यांच्या बातम्या समाजाचे वास्तव दाखवतात.

या पुस्तकातून त्या अंधश्रद्धांचे आणि ऐतिहासिक मानसिकतेचे मूळ उघड केले आहे, ज्यामुळे भारतीय स्त्रीची स्थिती अशी झाली. वैदिक काळातील तथाकथित ‘सुसंस्कृत’ प्रतिमेपलीकडचा सत्य इतिहास उलगडत, हे पुस्तक स्त्रीच्या वास्तवातील स्थान आणि तिच्या सशक्ततेकडे नेणारा विचारप्रवाह मांडते. आजच्या स्त्रीमनाची जडणघडण समजून घ्यायची असेल, तर हा इतिहास जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

2) आस्तिक शिरोमणी चार्वाक-

चार्वाक ! भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक उमदे आणि विवेकनिष्ठ, परंतु उपेक्षित आणि तिरस्कृत दर्शन. लोकायत हे या दर्शनाचे म्हणजेच तत्त्वज्ञानाचे आणखी एक नाव. हे चार्वाकदर्शन म्हणजे एका बाजूने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील एक धगधगणारा निखारा. अन्यायावर व शोषणावर जबरदस्त आघात करणारी एक स्फोटक आणि जळजळीत विचारसरणी. परंतु दुसऱ्या बाजूने ज्याच्यातून आशावादाचा सुगंध दरवळत आहे, असे एक प्रसन्न, टवटवीत फूल. मानवी जीवनातील माधुर्यावर उत्कट प्रेम करायला शिकविणारी एक जिवंत विचारप्रणाली. पारलौकिक भ्रमांच्या पाठीमागे धावण्याऐवजी पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंतचे वास्तव असे मानवी जीवन, याच जगात, निकोप प्रयत्नांच्या द्वारे, निरामय आनंदाने काठोकाठ भरून टाकावे, असे सांगणारी एक इहवादी, जीवनवादी आणि आनंदवादी भूमिका.

3) मनूस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती-

मनुस्मृती हा कायद्याचा व नीतिनियमांचा जगातील आद्य ग्रंथ आहे अशा प्रकारे अनेकदा तिचा गौरव केला जातो. पण हा गौरव करताना ऐतिहासिक प्रक्रिया सामान्यतः ध्यानात घेतली जात नाही. वस्तुतः जो ग्रंथ आद्य असेल तो अनेक त्रुटींनी युक्त असण्याची शक्यता आपण मान्य केली पाहिजे. काळाच्या ओघात पुढचे ग्रंथ अधिक विकसित, परिपक्व व परिपूर्ण होणे योग्य म्हटले पाहिजे. परंतु मनुस्मृतीला आद्य ग्रंथ म्हणणाऱ्यांची भूमिका अशी नसते. एकीकडून त्यांना आद्य म्हणून मनुस्मृतीचा गौरवही करायचा असतो आणि दुसरीकडे ती सर्वश्रेष्ठ म्हणून तिचे गुणगानही करायचे असते. अशा गोष्टींची निर्मिती ईश्वरापर्यंत वा एखाद्या देवतेपर्यंत मागे नेली जात असल्यामुळे त्या गोष्टीला आद्यता व सर्वश्रेष्ठता हे दोन्ही गुण चिकटवण्यात त्यांना कोणतीही विसंगती वाटत नाही. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असू शकत नाहीत.

मनुस्मृती हा कायद्याच्या क्षेत्रातील आद्य ग्रंथ तर नाहीच, पण तो आदर्श वा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असेही म्हणता येत नाही.


4) विद्रोही तुकाराम -

वयाच्या विशीत असलेल्या तुकारामांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला, हे खरे आहे. पण हा साक्षात्कार आध्यात्मिक स्वरूपाचा नव्हता, तर सामाजिक न्यायाच्या स्वरूपाचा होता. या साक्षात्कारानंतर त्यांनी पहिले पाऊल उचलले, ते वडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचे होय. त्यांनी हे कृत्य संसाराला विटल्यामुळे नव्हे, तर संसाराला चिकटणारा शोषणाचा घटक छाटून टाकण्यासाठी केले. अन्नान्न दशा झाल्यामुळे ते ईश्वरभक्तीकडे वळले, हे काही लेखकांचे म्हणणेही खरे नव्हे. कारण, मी जनार्दनाकडे आलो, ते काही अन्नाला महाग झालो होतो म्हणून नव्हे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मी वेदांचा अंकित नाही, भेदभाव सांगणारा वेदांचा भाग गाळून उरलेला भाग मी प्रमाण मानतो, सर्वांच्या ठिकाणी समत्व पाहणे हे ब्रह्माचे स्वरूप न जाणणारा पंडित दुराचारी होय, अशी भूमिका त्यांनी घेतली. सर्वांचे चर्म व मांस समान असताना भेदभाव कशाच्या आधारे करायचा, वाण्याच्या दुकानातून गूळ घ्यायचा असेल तर त्याची जात व कूळ कशाला विचारायचे, गावाचा मोकाशी हलक्या जातीतील असला तर त्या कारणाने त्याची आज्ञा मानायची नाही काय, असे प्रश्न त्यांनी विचारले. महार व्यक्तीला स्पर्श झाल्यामुळे ज्याला राग येतो तो काही खरा ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे, त्याने देहान्त प्रायश्चित्त घेतले तरी त्याचे पाप फिटत नाही, असे त्यांनी म्हटले.

5) पुरंदरेची इतिहास द्रोही बखर -

पुरंदरेंनी कितीही आव आणला, तरी ते शिवचरित्राकडे स्वच्छ दृष्टीने पाहू शकलेले नाहीत. त्यांनी शिवचरित्र हे आपल्या एका संकुचित उद्दिष्टाचे साधन मानून आपले पुस्तक लिहिले आहे, ही त्यांची सर्वांत मोठी मर्यादा आहे. एका विशिष्ट वर्गातील तरुणांना दुसऱ्या एका वर्गातील लोकांच्या विरोधात पेटून उठण्यास प्रवृत्त करावे, याच हेतूने त्यांनी महाराजांचे चरित्र लिहायला घेतल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत एकांगी झाले आहे.
चरित्रनायक शिवाजी महाराज हे जातिधर्मांच्या पलीकडे जाऊन आपल्या अंतःकरणात सर्वांना सामावून घेणारे आणि त्यांचे चरित्र लिहिणारा लेखक मात्र निःसंदिग्धपणे स्वजातिवर्चस्वाच्या भावनेने पुरता पछाडलेला. असा मनुष्य त्या महामानवाच्या चरित्राला न्याय कसा देऊ शकेल बरे ?
पुरंदरे, तुम्ही बहुजन समाजाला खोट्या, बदनामीकारक, कृत्रिम, नकली, बनावट, फसव्या भाषेच्या भपक्याने दीर्घकाळपर्यंत खुलवले, झुलवले आणि भुलवले - पण अस्सल आशयाने फुलवले मात्र नाही ! मानले पाहिजे तुम्हांला : आपल्या जनसमूहाचे वर्चस्व टिकवण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या हो तुम्ही.

📚 मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह 💙 आंबेडकरी साहित्य आणि बौद्ध पुस्तके

You may also like